महाबलेश्वरची अविस्मरणीय सहल
अनुक्रमणिका प्रस्तावना पिक्निक ला निघताना प्रवासातले अड्थले पुणे दर्शन सिंहगडचे पेरू वे टू पाचघनी रात्रिच्या निवासाची सोय....कोनी रूम देताय का रूम टेबल लँड़ आणि धूके परतिचा प्रवास १. प्रस्तावना आयुष्य खूप सुंदर आहे. हे सुंदर आयुष्य अनुभवण्यासाठी वर्षातून एकदा तरी पिकनिकला जावे. त्यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. कुठेही जिथे तुमचं मन रमत, जिथे तुम्हाला आनंद मिळू शकतो. प्लॅनिंग मध्ये खूप जण असतात हो, पण प्रत्येक्षात मात्र कोण येत नाही. जे आले त्यांनी आयुष्यातली मजा अनुभवली. अशाच एका पिकणी ग्रुपच्या पोरांनी एक सहल काढली आहे. पिकनिकचे काहीही अनुभव नसताना. नुसत्या तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकनिकला गेले. मग प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे कसे जायचे हे दाखवले आहे. मी आशा करतो की छोटीशी कथा तुम्हाला नक्की आवडेल. पिक्निक ला निघताना गावच्या पोरांनी सहलीला जायचे ठरवले. जाण्याचे ठिकाण आणि तारीख ठरल्या. मी त्या दिवशी ऑफिसमधून लवकर निघालो कारण मला दुर्बीण भाड्याने घ्यायची होती. त्याचा भाडा रू. 600 आणि 1500 डिपॉझिट असा होता. मी पटकन जेवलो आणि जुईनगरला निघालो. १०:...