महाबलेश्वरची अविस्मरणीय सहल


अनुक्रमणिका


  1. प्रस्तावना

  2. ​​​​पिक्निक ला निघताना

  3. प्रवासातले अड्थले

  4. पुणे दर्शन

  5. सिंहगडचे पेरू

  6. वे टू पाचघनी

  7. रात्रिच्या निवासाची सोय....कोनी रूम देताय का रूम

  8. टेबल लँड़ आणि धूके

  9. परतिचा प्रवास



१. प्रस्तावना 


आयुष्य खूप सुंदर आहे. हे सुंदर आयुष्य अनुभवण्यासाठी वर्षातून एकदा तरी पिकनिकला जावे. त्यासाठी  कुठे लांब जायची गरज नाही. कुठेही जिथे तुमचं  मन रमत, जिथे तुम्हाला आनंद मिळू शकतो.


प्लॅनिंग मध्ये खूप जण असतात हो, पण प्रत्येक्षात मात्र कोण येत नाही. जे आले त्यांनी आयुष्यातली मजा अनुभवली. अशाच एका पिकणी ग्रुपच्या पोरांनी एक सहल काढली आहे. पिकनिकचे काहीही अनुभव नसताना. नुसत्या तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकनिकला गेले. मग प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे कसे जायचे हे दाखवले आहे. मी आशा करतो की छोटीशी कथा तुम्हाला नक्की आवडेल.






  1. पिक्निक ला निघताना


गावच्या पोरांनी सहलीला जायचे ठरवले. जाण्याचे ठिकाण आणि तारीख ठरल्या. मी त्या दिवशी ऑफिसमधून लवकर निघालो कारण मला दुर्बीण भाड्याने घ्यायची होती. त्याचा भाडा रू. 600 आणि 1500 डिपॉझिट असा होता. 


मी पटकन जेवलो आणि जुईनगरला निघालो. १०:३० PM ला मी जुईनगर स्टेशनला पोहोचलो. बॉस त्याची कार Santro ने बाला, कौशल आणि रवीला घेऊन निघाला. तर संतोष Ecco ने बाकीच्या पोरांना घेऊन येत होता.


 मी एलपी बस स्टैंड वर त्यांची वाट बघत थांबलो. पिण्यासाठी बिसलेरीच्या बॉटल्स ची गरज होती म्हणून एका बॉटल विक्रेत्याकडून 24 bottles रू. 360 ला खरेदी केल्या. मी ते बारा बारा चे दोन सेट घेऊन बसस्थानकावर त्याची वाट पाहत बसलो. 


त्या दोन्ही गाड्या आल्यावर सामान व्यवस्थित ठेवून आपापल्या जागेवर बसलो. आमच्या सोबत दोन लहान मुले आणि दोन जोडपे होती. त्यांना बॉस ची कार दिली आणि बाकीच्यांना Ecco मध्ये बसवले. गणपती बाप्पा चे नाव घेऊन प्रवासाला सुरुवात झाली.


 Ecco बॉस चालवत असून त्यात मी, बाला, मनेश, कौशल, विलास, प्रकाश आणि  छोटू  होता. तर Santro मधे संतोष चालक असून, त्यात त्याचि बायको , नरेंद्र, नरेद्रची बायको आणि रवी. Ecco पुढे निघाली. आमच्या पोरांची मस्ती सुरू झाली. मनात खूप उत्सुकता होती. तब्बल दोन वर्षांनी पिक्निकला निघालो होतो. आमची Ecco फूढे असताना, संतोष च्या अंगात काय संचारले कायमाहित त्याने कार स्पीड मध्ये चालवायला सुरुवात केली. सर्वांना ओव्हरटेक करत पुढे निघून गेला आणि पेट्रोल पंपा जवळ जाऊन Santro चा  टायर पंक्चर झाला. सर्वांनी त्याला मदत केली. अर्धा तास टायेर चेंज करण्यात गेला. नशीब दुसरा टायर होता म्हणून. पुढे निघताच भुक लागली, मग मी आणलेल्या चकल्या सर्वाना वाटल्या. 




 मला थोडा डोळा लागला म्हणून झोपी गेलो. दोन पाय बाळाचा खांद्यावर ठेवुन मागच्या seat वर आड़वा पडलो. पण तो म्हणाला आधीकाहीतरी खायला दे मग ठेव. केळ्याच्या वेफ़र्सची पिशवी त्याच्या स्वाधीन केली. सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. मी मस्तपैकी पाठी मागच्या सीटवर टेकून, दोन पाय त्याच्या खांद्यावर ठेवन झोपलो. मस्त झोप लागली.


३. प्रवसातले अड्थले 


………३ तासनंतर……


 “कुठे आहेस?” “आम्ही ब्रिज वर पोहोचलो आहोत “ एवढे शब्द कानी पडताच माझे डोळे उघडले. कुठेतरी उंच ठिकाणी असलेल्या हायवेवर पोचलो होतो. पुढे संतोष आणि बाकिचे Santro कार बाजूला लाउन उभे होते. शेज़ारी ट्राफिक पोलीस पन होते. काहितरी गड़बड़  झाली असावि म्हणुन आम्ही पटापट  मास्क लावून खाली उतरलो. उतरल्यावर कळालं की कार मध्ये बिघाड झाला होता. Santro कार हायवेच्या मधोमद बंद पडली. त्यातून  धूर धूर निघू लागला. ते पाहताच काही ट्राफिक पोलीस मदतीला धावून आले. कारमधून सर्वांना बाहेर काढले. टोचन लावून कार बाजूला घेतली.  हे ऐकून बॉस चा राग अनावर झाला. त्यांनी संतोषला खूप सुनावले “ तुला सोबत राहता येत नाही का? इतक्या स्पीड मधे चालवायची काय गरज होती”? कशीबशी कार सुरु केली. पुढे जाऊन परत बंदपडली. परत थांबलो. असे दोन ते  तीन वेळा घडले. कंटाळून चहाच्या टपरीवर जाऊन थांबलो. सर्वांनीच चाय तर फक्त बाला कॉफी पियाला. चटणी भाकर आणली होती ती सर्वांनी खाल्ली. 


आता जेमतेम आम्ही लोनावला पार केला होता. पन कार काही सुरू  होयच नावच घेत नव्हती. मग काही जणांना Ecco मध्ये शिफ्ट करून संतोषला गॅरेजला पाठवले. आम्ही चौघे जण मागे कार जवळ थांबलो. कार खूप गरम झाली होती. थंड होयाचि वाट पाहिली. Garage मिलताच दिलेल्या लोकेशन वर जाऊन पोहोचलो. आम्हा सर्वांना असे वाटत होते की, कार आता सुरू होईल आणि आम्ही निघू. पण नियतीचा खेळच वेगळा.


 इंजिनीयरने engine च्या पाईप मध्ये पाणी टाकले आणि कार सुरु करायला सांगितली. त्या पाईप मधून सो.. सो.. करत धुर निघाला. त्याने मग त्याच्या साहेबाला फोन करुन आम्हाला 14 हजार रुपयांचा खर्च होईल असे संगीतले. हे ऐकून माझ्या तर श्वासच कोंडला. हेतर अति आहे. मग काय, संतोष Ecco घेऊन गॅरेज च्या शोधात पुढे निघाला. आम्ही दुसरी कार भाड्याने मिळत आहे का ते पाहत होतो. मी इंटरनेटवर खूप कॉल करून पाहिले. पण त्यांचे भाडे खूप अति होते. कोण म्हणे सात हज़ार रुपये तर कोण म्हणे बारा हजार रुपये. सगळेजण लुटायला बसले होते. मनेश आणि कौशल हगायला पेट्रोल पंपावर गेले. बराच वेळ झाला ते पण येत नव्हते. फोन करून दोन शिव्या दिल्यावर धावत पलत आले. कशीबशी कारची ढकलगाडी करत पुढे नेली. तिथे दुसरा इंजिनिअर भेटला. त्याने काय करावे? त्याने सुद्धा तेच पाणी टाकून धूर काढला आणि 15 हजार रुपयांचा खर्च सांगितला. काही न बोलता गाडीत बसलो आणि पुढचा रस्ता पकडला. मी गुगल मॅप वरून एका इंजिनिअर ला फोन लावला. त्याचा गॅरेज पाच किलोमीटर अंतरावर होता. त्याच्या कड़ून आम्हालाकाहीतरी अपेक्षा होती. तो पुढे बुलेट वर बसून आमची वाट पाहत होता. जाताना रस्त्याच्या कडेला असलेली पिवळी फुले मनाला प्रसन्न करत होती. किती सुंदर होती ती फुले. 

बॉस अस्ती अस्ती करत कार घेऊन आला. Garage अजुन उघड़ला नव्हता. त्यांनी चावी बॉस च्या हतात दिली. बॉसने कुलूप उघडून शटर वर करण्यासाठी लोखंडाची सळी हातात घेतली. जोराने घर घर फिरवत शटर वरती  करू लागला. मला पण तसं करायची इच्छा झाली. मी full जोश मध्ये आलो. ती लोखंडाची सळी  बॉस च्या  हातातून घेतली. सगलेजन मझ्याकड़े बघायला लागले. मी काय कारतोय ते. सळी खाच्यात अड़कउन  फिरवायला सुरुवात केली. शरीराने बारीक असल्यामुळे मला ती फिरावता येत नव्हती. सर्वजण मला पाहून हसायला लागले. फिरवताना लोखंडी सळीचे दणके माझ्या हाताला बसत होते. “ठेव ठेव तुझ्यात नाय होनार”, बॉस ने कॉमेंट केली. मग त्या इंजिनियरने माझ्या हतातुन घेऊन त्याने  झटकशी फिरवून  गॅरेजचा डोअर ओपन केला. सर्वांप्रमाणे त्यांनी सुद्धा पाणीटाकून जास्त धूर काढला. पण त्याने तर कमालच केली 25 हजार रुपयांचा खर्च सांगितला. सर्वांच्या आशा निराशा झाल्या चार हजारचा खर्च ते पंचवीस हजार पर्यंत सांगतात कमाल आहे.


 सेवटचा पर्याय म्हनून टोचन वाल्यांना फोन करून त्याच्याशी बार्गेनिंग करून 5000 रुपयात Santro कार मुंबईला रवाना केली. फक्त आता बंदोबस्त करायचा होता तो नवीन कार भाड्याने घ्यायचा. बॉस  ने त्याच्या सोबत चौघा जणांना मागे ठेवून बाकीच्यांना Ecco ने फ़ूडे जाण्यास सांगितले. 


४.  पुणे दर्शन



नवीन कार भेटत आहे का ते बघन्यासाठी मी, रवी आणि संतोष कॉल वर कॉल करू लागलो. काहीजण भाडा आठ हजार तर काही बारा हजार, तर काही जण लोकल असल्याचा पुरावा मागत. असे करता करता एकाने रुपये दहा हजार डिपॉझिट आणि दोन हजार भाड़ा परडे ठरवला. त्याचे लोकेशन पुण्याच्या विमान नगर ला होते. मग आम्ही Ecco त्या दिशेने वळवली. बॉस ला सुद्धा कुठे आहेस हे विचारले. ते बस ने भोसरी ला पोचलेले. त्यांना भोसरिला भेटलो. तिथली पायाभूत सुविधा अप्रतिम होती.  ब्रिज ची रचना अतिशय उत्तम आणि स्वच्छता होती. प्रत्येक चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे  उभे असत. 

 मी, बॉस, मनेश आणि नरेंद्र भोसरिच्या 🤭बस स्टॉप वर थांबलो. संतोष बाकीच्यांना Ecco ने घेवुन दुसरी कार आणायला गेला. दोन तास झाले तरी त्यांचा अजून पत्ता नव्हता. त्यांना कार अजून भेटली नव्हती. बॉस खूप वैतागला आणि चिडला😡त्यांना कॉल करून स्वारगेटला भेटायला सांगितल. स्वार्गेट का सिंहगड ला का नाहीं? कारण सिंहगड साठि डिरेक्ट बस नव्हती. आम्हीबस मधून स्वारगेटला निघालो. बसमधून जाताना पुण्याचे अप्रतिम दर्शन घडले. उंच इमारती, लांब सोडणारे मोठमोठे ब्रिज. काहीठिकाणी संतांचे तर काही ठिकाणी शिवरायांचे पुतळे उभारलेले दिसत. पुण्यात खूप सारी मंदिर पाहायला मिळाली. अप्रतिम होती त्यांची रचना. पुणे शहर मुंबईपेक्षा  सुशिक्षित वाटले. बॉस पुण्याचे ते सुंदर ठिकाण पाहून मला ओरडत होता. म्हणे तुला पुण्याचे एवढेचांगले स्पॉट  सोडून लांब लांब घ्यायची काय गरज होती. त्याचा संताप  समजत होता. रात्रीची अर्धवट झोप आम्ही बस मध्ये पूर्णकेली.  माझे डोळे खूप जड झाले, पण झोपू शकत नव्हतो. कारण झोपेच्या नादात स्वार्गेटला नाही उठलो तर म्हणून मी मध्ये मध्ये  स्वतःला जागा करी.



 दोन वाजता आम्ही काय ते स्वारगेटला पोचलो. आम्हाला चौकात सोडले. नवीन शहरात आलो आहोत म्हनून इकड़े तिकड़े पाहु लागलो. चारही दिशांना जाणाऱ्या गाड्या, खाली भुयारी मार्ग, तर वरून वेडीवाकडी वळणे घेणारी उड्डाणपूल. तिथे खूप गर्दी आणि वाहनांची वर्दळ होती. आम्ही चौकात उभारलेल्या लोखंडी धातूच्या  पुतळ्या जवळ उभे राहिलो.  त्या शहराशी आम्ही अपरिचित होतो. त्यांची वाट पाहुन सर्वांचे चेहरे पडले होते. सकाळपासून कोणी अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. माझी तर भूकच मेली होती. का नाही, कारण पिकनिकचे नियोजन करण्याची जबाबदारी माझी होती. सर्वांचा माझ्यावर विश्वास होता. पण योजनेची सर्व गणितच विस्कटली. खरंतर सर्वांना संतोषचा राग येई. मधे असा काही विचित्र वागे की त्याचा त्रास सर्वांना होई. स्वारगेटला आम्ही बसने पोचलो तरी ते लोक अजून कार ने पोहोचले  नव्हते. 


नवीन कार संतोष तर Ecco विलास घेऊन येत होता. विलास तसा नवीन चालक होता. त्याच्या बाजूला बसलेला बाळा त्याच्या प्रत्येक चुका काढे. दोघांची भांडणे होत. तेवढेच  बाकीच्या मित्रांचं एंटरटेनमेंट होई. बाळा त्याला बोले “कशी गाडी चालवतोस ,नीट चालव, असा गिअर  टाक”.  कनफ्यूज झालेला विलास त्याना  नाशिक रोड ला घेऊन गेला. मग त्यांना अजून उशीर झाला. 

तब्बल एक तासानंतर संतोष कार घेऊन चौकात उभा राहिला. बॉस निरास होऊन बाकावर बसला होता. त्याने संतोष ला खूप खडसावले. पण संतोष तो याची खोड काय जाणार आहे. पण ते जाऊ दे, नवीन आणलीली काय तरी कशी होती? दिसायला देखणी. लाल रंगाची swift, डीज़ल खानारी, मनमोहक, जणू काही नवीनच आणली आहे. मला तर असे वाटते ‘संतोष ने इंद्र देवासी युद्ध खेळून त्याचा रथच आणला आहे’. तिला पाहून माझा सकाळ पासूनचा संताप आणि राग दोन्ही उतरला. मला त्या swift मधे बसायचे होते. पण Ecco मध्येसर्व पोर होती, त्यांच्या बरोबरीची मजा कसी miss करनार.


५. सिंहगडचे पेरू


 “आता नवीन कार मिळाली आहे तर सर्वप्रथम आपण सिंहगड वर जाऊ,“ असे  बॉस ने सर्वांना सांगितले. सर्व आपापल्या जागेवर जाऊन बसले. संतोष मार्ग दाखवण्यासाठी पुढे निघाला. पण तो कधी पुढे जाई तर कधी मागे येइ. आणि कधी तर कुठे गेला तेच कळत नसे. अशा चप्पल संतोष वर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच  गुगल मॅप काढावा आणि आणि पोहोचावे. असे  बॉसला वाटले. त्याने मला गुगल मॅप वर डायरेक्शन दाखवा सांगितले. मी आता दिशादर्शक झालो होतो. तो काला कृष्णा रथ चलवनारा, तर मी धनुर्धारी अर्जुन झालो. 


आम्हाला आता धीर आला होता. सकाळपासूनच्या धावपळीपासून. झालं ते झालं. कमीत कमी गड तरी बघायला मिळेल. गडाच्या पायथ्या जवळ पोचलो. काही गाड्या परत जाताना दिसल्या. बहुतेक त्यांच गड बघून झाला असाव. उत्साहाने चालवणाऱ्या बॉसने  जोरात रस्त्यावर लावलेल्या baricate जवळ येऊन ब्रेक लावला. गाडीच्या वेगाबरोबर सर्व पुढे झुकले. Baricate वरची नोटीस वाचूनमाझ्या काळजात जोराची चमक भरली. हे काय अनर्थ घडले. गड बंद? एवढे तीन हजार रुपये खर्च करून काहीच हाती लागले नाही. मीसर्वांचा विश्वासघात केला, असे झाले. माझी मान शरमेने खाली झुकली. कारण मी या सर्वांसाठी जबाबदार होतो. काही विचारपूस नकरता मी इथे सर्वांना आणले. सर्वांनी विश्वास ठेवला होता. शिक्षण घेणे म्हणजे नुस्त पदवी किंवा प्रमाणपत्र मिलवने नव्हे. शिक्षणासोबत एक जबाबदारी सूद्धा येते. त्या मित्रांना वाटलं होतं की, किशोर शिकलेला आहे. चांगला पिकनिकचा प्लॅन बनवेल, पण त्यांच्या आशा निराशा झाल्या. मग सर्वांचं मन  शांत करण्यासाठी मी शंभर ची नोट मनेश च्या हातात दिली आणि पेरू आणायला पाठवले. त्यांनी आणलेली पेरू या खट्याळ व उपाशी मित्रांनी गचा गचा खाऊन टाकले. पेरू इतका गोड होता की, त्याचा प्रत्यक चावाअनुभवुन खात होतो. त्या गोड फलाने सर्वांचे मन तृप्त केले आणि मी त्यांना आश्वासन दिले की आपली पाचगणी ला जाण्याची फेरीव्यर्थ जाणार नाही. मी स्वतःहून एका रेस्टॉरंट वाल्याला मुद्दामून फोन केला आणि कोण कोणते ठिकाण चालू आहेत ते जाणून घेतले. गम्मत मंजे त्या बिचाराने ग्राहक येत आहेत म्हणून सर्व काही सांगून टाकले.

 मधेच swift घेऊन गायब झालेला संतोष. आमच्या मागे आला आणि विचारतोय, " काय झालं? मागे का फिरलात ?” संतापलेल्यामनेशने Ecco च्या खिडकीची काच खाली केली. हळूच मान बाहेर काढून दोन शिव्या 🤬दिल्या. शिव्या ऐकून संतोष गप बसला. कारण संतोष सुद्धा प्लॅनिंग करण्यासाठी जबाबदार होता. 


६. वे टू पाचघनी

आम्ही आमच्या गाड्या Ecco आणि Swift पाचगणीला जाण्यासाठी हायवेवर वळवल्या. जाताना कुठे ढाबा दिसतोय का ते पाहिले. हायवेला लागून असलेल्या ढाब्यावर आम्ही उतरलो. मला तर veg आवडतो, पण बाकीचे nonveg खाणारे होते. मग मी पण non veg मागवण्यास सांगितले. बॉसने 28 रोटी, दोन चिकन हंडी आणि जीरा राईस ऑर्डर केला. भुकेने बेचेन झाल्यामुळे प्रत्येक तुकडा व घास जिभेला चव देऊ लागला. वाढलेलं ताट चाटून पुसून खाल्ल्या. जेवल्यावर एक काडी उचलून दातात अडकलेल्या तुकडा काढत बसलो. वेटर ने दोन हजार रुपयाचा बिल फाडला. 


आता संध्याकाळचे पाच वाजले होते. पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. बॉस ने मला swift मध्ये बसायला सांगितले. मी खूष यासाठीझालो कारण मला swift मध्ये बसायचे होते. दुख: यासाठी वाटले की, Ecco मध्ये सगळे जण मजा मस्ती कारणारे होते. Swift मध्ये दोन जोडप्यांबरोबर बसताना कसे तरीच वाटत होतं.  संतोष गाडी चालवत होता तर त्याचि बायको बाजूला बसली होती. मागे नरेंद्र आणि त्याची बायको, मी मागे डाव्या खडकीला बसलो प्रवासाची मजा घेत. सर्वात पुढे आम्ही गेली. जाताना रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाची फुले डुलत होती. अप्रतिम वाटत होतं ती फुलं. जणु काही आमच्या स्वागताला उभी असावीत. जसे सीतेला हरणाने भुलवले, तसे त्या संतोषच्या बायकोला पिवल्या फुलानी. ती त्याला गाडी थांबवण्यास आग्रह करी. पण तो थांबायला तयार नव्हता. पण ती त्याला खूपच आग्रह करू लागली. त्याने मागे वळुन Ecco येत आहे का ते पाहिले. Ecco दूरवर कुठेही दिसेना. कदाचित सीएनजी साठी थांबले असावेत. असे त्याला वाटले म्हणून त्याने रस्त्याच्या कडेला Swift पार्क केली. मला पण तेच पाहिजे होते. खाली उतरताच फोटोशूट चालू झाले. संतोष आणि त्याची बायको बींधास्त फोटो काढत. बाकीचे येणारी जाणारी लोक त्या जोडप्यांकडे कौतुकाने पाहत. दुसरीकडे नरेंद्र आणि त्याची बायको दोघेही राजवट. एक फोटो काढला नाही काढला करत. मी काही त्यांच्यात पडलो नाही. सर्वप्रथम माझ्या सवयी प्रमाणे एक मस्त पूल उपटला आणि उजव्या कानात अडकवला. बाकीची फुले कुटुन Swift मध्ये असलेल्या गणपतीबाप्पाला वाहिले. त्या फुलांना सुगंध नव्हता. पण मात्र आकर्षक होती. माफ करा मला त्यांचं नाव माहित नाही.


यावेळी मात्र मी पुढच्या सीट पकडली. पायातले बूट काढून, मस्तपैकी मांडी घालून बसलो. स्वीट मध्ये बसायचा आनंद तो वेगळाच. सुंदर नैसर्गिक वातावरण. वर ढग फेर्या मरनारे. दूरवर सह्याद्रीच्या कड्या मागून विजा चमकताना दीसले. Swift मधला प्रवास इतका मस्त होता की जेव्हा पन कार घेइन, तेव्हा हाच मॉडेल खरेदी करेन. दिसायला तिचा आकार एका सुंदर स्त्री पेक्षा कमी नव्हता. मी तर सेक्सी म्हणेन. 


पुढे एक भुयारी मार्ग लागला. झटपट मी माझा कॅमेरा ऑन केला. मला तर जोराने ओर्डावेसे वाटे. अप्रतिम आनंद प्रवासाचा. 


सातारा हायवे ओलांडून आता पाचगणी साठी उजवीकडे वळायचे होते. अजून Ecco मागेच होती. म्हणून मी उस पिण्यासाठी उतरलो. उसाच्या रसाची चवच निराळी. पण महाग विकला वीस रुपयाला. मुंबईला हाच ग्लास दहा रुपयाला मिळतो आणि इथे तर उसाची शेतीपण आहे. 


७. रात्रिच्या निवासाची सोय…कोनी रूम देताय का रूम



वाईला फोहचताच रात्रीच्या निवासासाठी रूम शोधण्यास सुरुवात केली. कारण पाचगणीमध्ये जस जसे आत जाऊ तसतशी रूम महाग भेटेल. दोन्ही गाड्या सोबत होत्या पण गाडीतून विचारपूस करायला मी आणि मानेशचं उतरे. पहिल्या हॉटेल मध्ये 3000 रुपये दोन रूम साठी. याही पेक्षा स्वस्त भेटत आहे का ते पाहायला पुढे गेलो. पुढे काही जण 4000 सांगत तर काही जण 7000 सांगत. असे करता करता आम्ही टेबल अँड ला निघालो. रात्रीची वेळ होती. सह्याद्रीची डाग लागली. समोरून येणाऱ्या गाड्यांचा उजेड ड्रायव्हरच्या डोळ्यावर पडे. गाडी चालवण्यास कठीण जाई. पुढच्या गाडीला ओव्हरटेक सुद्धा करता येत नव्हते. बॉस आमच्या मागुन येत होता. वेडीवाकडी वळणे घेत. प्रत्येक वळणावर सावधानी घ्यावी लागत असे. मी तर उंचावरून दिसणाऱ्या, अंधारात चमकणाऱ्या शहराचा आनंद कॅमेरामध्ये कैद करत होतो. 


कशीबशी डाग चडुन टेबल लैंड ला पोहोचलो. प्रवेश करताच आमच्या कडून १०० रुपयाचि पावती फाडली. पावती फाड़नार्या काकांना कोठे रूम मिळत आहेत का ते विचारले. त्यांनी एक ठिकाण सांगितले तिथे मी आणि नरेंद्र गेलो. खरं तर आम्ही दोघेही जाणकार नव्हतो. रूम मालकाने आम्हाला तीन रूम दाखवल्या. पहिली रूम लहान १,५०० रुपये, दुसरी त्याच्या पेक्षाही मोठी  २,००० रुपये आणि तिसरी मोठी पण तिला गैलरी होती. म्हणून भाडे 2500 सांगितला. त्यांना आमचा बजेट आणि माणसं स्पष्ट केले. आम्हाला 14 माणसांसाठी २ रूम हव्यात. मालकाने 14 माणसे येत आहेत ऐकून नकार दिला. मग पुढे गेलो. फ़ुडे एक उजवा हात निकामी असलेला व्यक्ती भेटला. त्याने तर ७,००० सांगितले. खरं तर सर्वजण वैतागले होते आमच्या दिवसभराच्या धावपळीत.

देवाच्या कृपेने भेटली का ती रूम. तिथे भाड़ा 3,000 रुपये दोन रूम साठी. बेडवर मी, विलास, रवी आणि कौशल. तर खाली जामिनिवर वर बॉस, बाला, मनेश आणि प्रकाश झोपलो. एक वेगळी रूम दोन जोडप्यांना दिली. रात्री खूप थंडी लागत होती. झोप पण तितकीच छान झाली. सकाळचे सहा वाजले. मी रूमच्या बाहेर असच walk ला जाऊन आलो. नुसतं धूकच धुक पडलं होतं. उंच उंच झाडं, पक्षांचा चिवचिवाट सुटला होता.


८ . टेबल लँड़ आणि धूके


सगळ्यांनी चाय पिल्यावर टेबल लैंड ला निघालो. इथून सुदैवाने एक किलोमीटर अंतरावर होता. झिगझॅग पॅटर्नमध्ये चढण लागली. परिसर निसर्ग इतका सुंदर होता की, वाटे आताच उतरावे आणि फोटोशूट करावा. टेबल लँड पोचताच नाष्टा केला. तिथे उंच, मजबूत, वेगवेगळ्या रंगांचे घोडे उभे होते. घोड्यांच्या पायांचा टकाउ टकाउ आवाज खूप वर्षांनी ऐकला. सकाळ असल्यामुळे खूप धुक पडले होते. एक भुताटकी चित्रपट सारखं. तिथे फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता आला नाही. तिथली भूरचना अशी होती की उंच डोंगरावर सपाट जमीन.

 सर्वजण फोटो काढण्यात मग्न असतानाच मी दुर्बिणीतून निसर्गाचा मानसोक्त आनंद घेत होतो. पुढे मला काही तरी पाण्यासारखं जाणवलं. ते सरोवर तर नाही ना? असा भास झाला. पण तो तलाव होता. पाणी दिसत नव्हते कारण पाण्याच्या वरती धुके जमा झाले होतं. मी त्या तलावा पाशी गेलो. किती निव्वल पाणी आणि थंडगार होतं! रांगेत पोहोनार्या बदकांचे दृश्य दुर्बिणीतून डोळ्यात टिपले. 


९. परतिचा प्रवास


टेबल लैंड नंतर मॅप्रो गार्डन, वेण्णालेक आणि लॉडविक पॉईंट ला गेलो. जरी कालचा दिवस फुकट गेला तरी त्याची मजा आम्ही आजभरून काढली. आम्ही सर्व फिरून झाल्यावर Swift परत करण्यासाठी गाडी स्वारगेटला फिरावली. स्वारगेट वरून मुंबईला जाणार होतों. 

रात्रि १० ला स्वर्गेट ला फोहोचलो. संतोषने स्विफ्ट रस्त्याच्या कडेला पार्क केली. Ecco ची वाट पाहत होतो. Ecco घेऊन बॉस आला. आणि ओरडु लागला “अरे बोसरिच्या! इथे मधेच का थांबवलीस. पुढे मोकल्या जागेवर ने ना”. संतोष ने गीयर टाकला आणि गाडी पुढे. नेली. आजूबाजूचि माणसं ओढायला लागली. आम्हाला काहीतरी गाडीखाली आल्यासारखं झालं. संतोष ने कूत्र्या वरुन तर नाही ना गाड़ी चढ़वली. माझ्या काळजातच चमक भरली. कारण संतोष च काय भारोसा नाय. काल पासुन त्याने काही कमी करामती नाही केल्यात. मी सर्वप्रथम  ख़ाली उतरलो. बघतो तर काय गाडी एका मलक्या बिछान्यावर(गादी) चढलवली होती. कुणीतरी रस्त्याच्या कडेला गादी फेकून दिलेलि. ती गटारात चिखलाने माखुन ओल्सर झाली होती. Swift खाली अड़कलेली. ती काढावी म्हणून मी तिला हाताने ओढायला लागलो. ती खुप घाणीत माखली आणि खुप घानेर्डा वास वास येत होता. मला कसंतरीच वाटत होतं. पण सर्व माणसं बघतहोती आमच्याकडे. माझ्यात ती खेचलि जाईना. म्हणून माझ्या मादतिला रवी आणि विलास आला. त्यांना पण काही जमेना. एका काकांनी गाडी मागे घ्यायला सांगितली. गादी सुटली पण मागच्या टायरला जावुन अटकलि. तिला बाहेर काढ़ने मुश्कील होते. कशीबशीती आम्ही काढली. हसू की रडू तेच कळत नव्हते. पोरं म्हणत ही पिकनिक आठवणीत राहील. मला पण कळत नाही या संतोष ला काय करामती केल्याशीवाय जमत नाही का? क़ाहिना काही अड़चनी निर्माण करतोच.


आता निरोप घायचा वेळ आला. “ही पिकनिक आठवनित राहिल रे”,बॉस म्हनाला.  बाकीच्यांचा निरोप घेतला आणि आम्ही बसने मुंबईला आलो. एक मात्र सांगू इच्छितो पिकनिक कुठेही असो मनाली असो वा बाली किंवा साध्या टेकडीवर. पिकनिक ग्रुप शिवाय मजा नाही. मी माझ्या मित्रांचा खूप आभारी आहे.




















धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

Adventure of majgad

1st and last date.

Adventure to Solambi: story of 3 brave kids.