रानटी कोंबडीचा पिल्लू

एक मुलगा सकाळी 7 वाजेपर्यंत झोपला होता. त्याचे मित्र त्याला हाका मारत बोलत होते. "अरे ये किशोर, अरे ये किशोर. येतोस ना रानान. चल लवकर." सकाळी साखर झोपेतून उठून त्याने फाटलेल्या वस्त्राची चिंबुल म्हणून घेतली. त्याच्या आईने सोबत भाकरी आणि सुकट दिली. मित्र पुढे निघून गेले. त्यांना गाठण्यासाठी तो धावत धावत गेला. एका हातात कोयती, दुसऱ्या हातात भाकरी व खांद्यावर चींबुल साठी फाटलेला कपडा घेऊन तो मित्रांपर्यंत पोहोचला. भाकरी चालता-चालता खायला सुरुवात केली. सर्वजण शांतपणे चालत होते. त्यांचा पायांचा आवाज व पक्षांचा किलबिलाट एवढा मात्र येत होता. वाटेत येणारे काटेरी झुडपे कोयतीने छाटत होतो. अर्ध्या वाटेत पहाटे लवकर गेलेल्या महिलांचा काही समूह लाकडांची मोळी घेऊन येताना भेटल्या. त्या विश्रांतीसाठी एका कातल मैदानावर थांबल्या. त्या महिलांचे वर्णन करायचं म्हटलं तर त्यांनी गोल जुन्या साड्या नेसल्या होत्या, मोळी घेऊन चालता यावं म्हणून साडी चा काही भाग वर उचलून कमरेला खवलेला. हातात काचेच्या बांगड्या, कपाळावर लाल भडक कुंकू आणि केस बांधून त्यांचा आंबोडा केला होता. उशिरान...