रानटी कोंबडीचा पिल्लू
एक मुलगा सकाळी 7 वाजेपर्यंत झोपला होता. त्याचे मित्र त्याला हाका मारत बोलत होते. "अरे ये किशोर, अरे ये किशोर. येतोस ना रानान. चल लवकर." सकाळी साखर झोपेतून उठून त्याने फाटलेल्या वस्त्राची चिंबुल म्हणून घेतली. त्याच्या आईने सोबत भाकरी आणि सुकट दिली. मित्र पुढे निघून गेले. त्यांना गाठण्यासाठी तो धावत धावत गेला. एका हातात कोयती, दुसऱ्या हातात भाकरी व खांद्यावर चींबुल साठी फाटलेला कपडा घेऊन तो मित्रांपर्यंत पोहोचला.
भाकरी चालता-चालता खायला सुरुवात केली. सर्वजण शांतपणे चालत होते. त्यांचा पायांचा आवाज व पक्षांचा किलबिलाट एवढा मात्र येत होता. वाटेत येणारे काटेरी झुडपे कोयतीने छाटत होतो. अर्ध्या वाटेत पहाटे लवकर गेलेल्या महिलांचा काही समूह लाकडांची मोळी घेऊन येताना भेटल्या. त्या विश्रांतीसाठी एका कातल मैदानावर थांबल्या. त्या महिलांचे वर्णन करायचं म्हटलं तर त्यांनी गोल जुन्या साड्या नेसल्या होत्या, मोळी घेऊन चालता यावं म्हणून साडी चा काही भाग वर उचलून कमरेला खवलेला. हातात काचेच्या बांगड्या, कपाळावर लाल भडक कुंकू आणि केस बांधून त्यांचा आंबोडा केला होता.
उशिराने जाणाऱ्या त्या मित्रांचे ते थट्टा उडवत, "असे उशीराने जाऊन का तुमच्यासाठी कोण ठेवणार लाकडं?" त्यांनी भराभर पाऊल टाकायला सुरुवात केली.
ते आता काटेरी वनात आले होते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि रानटी कोंबडीची होणारी धावपळ दिसत होती. किशोरला रानटी कोंबडी बद्दल नेहमी उस्तुकता असायची. त्याबद्दल त्याने तेजसाला विचारले, "तेजस तु कधी रानटी कोंबडीचे मटन खाल्ल आहेस का?" "नाही रे!", तेजसने उत्तर दिले. "का रे? तुला खायचय वाटतं? पण तू तर पक्षीप्रेमी आहेस ना?" तेजस ने विचारले. "हो रे!" पण मला सांग आपली गावातली माणसं शिकारीला जातात. मग त्यांनी आजवर का नाही पकडणे एखादी कोंबडी", किशोरने विचारले. "रानटी कोंबडी पकडणे मासा पकडण्या इतक सोप वाटतंय का तुला. ती अतिशय वेगाने आणि चप्पल असते. तीच खास वैशिष्ट्य म्हणजे तीला भरारी घेता येते. हेच कारण आहे की तिला पकडले मुश्कील आहे. तिची अंडी आकाराने लहान असतात. जर तिच्या अंड्यांना पाहिलंस किंवा जरी हात लावला तर ती अंडी पिऊन टाकते". तेजस म्हणाला.
रानटी कोंबडी वर गप्पा करता करता ते निलगिरीची उंचच उंच झाडे असलेल्या वनात पोहोचले. तिथ वाऱ्याने झुलणारी झाडे आणि लाकूड तोडण्याचा आवाज येई. "ठक..ठक.." तेथे निलगिरीची खूप झाडे वाऱ्याच्या जोरामुले पडली होती. त्यामुळे गावातली माणसं रोज सकाळी उठून लाकडांसाठी येथे येत. फक्त दक्षता घ्यायची होती रान शिपायांची ते कधी कधी येथे येत. पण जर ते आले मग सर्वांची पळापळ व्हायची.
त्या मित्रानमधून फक्त एकाणेच कुऱ्हाड आणली होती. कुऱ्हाड चालवणे ही एक कौशल्यच आहे. ती दोन्ही हातांनी योग्य अंतरावर पकडायची. जेणेकरून हाताला फोड येणार नाही. तिच्या प्रत्येक घाव नेमका बसला पाहिजे. नुस्त घाव एकाच ठिकाणी मारून चालणार नाही, तर थोडा भाग दुसऱ्या बाजूने फोडून पायाने जोरदार हिसका द्यायचा. किशोर कडे कोयती होती. त्याने छोटी-छोटी लाकडांचे तुकडे गोळा केले आणि आणलेल्या वस्त्रात गुंडाळले. सर्वांची लाकडे गोळा करून झाली होती. आता निघायला सुरुवात केली.
त्या दाट वनातून बाहेर पडून काटेरी झुडपात पोहोचले. तेजस सर्वांच्या पुढे, तर किशोर सर्वांचा शेवटी होता. "हे... हे... थांबा.. थांबा.. "तेजसने सर्वांना थांबवले. नरेश म्हनाला, "काय झाले तुला?" तेजस म्हणाला, "समोर बघ. आपला शिकार येतोय." थोडी काळी पण राखाडी रंगाची रानटी कोंबडी हळूहळू पावले टाकत चालत येत होती. तिच्या मागोमाग तिची दोन पिल्ले सुद्धा होती. ती आईच्या मागून आत्मविश्वासाने भिंधास्त पाऊल टाकत. तेजसने डोक्यावरची लाकड खाली ठेवून तिचा पाठलाग केला. माणसांची चाहूल लागताच ती काटेरी कुंपनात घुसली. नक्की ती कोठे गेली ते कळेनासे झाले. तेजसने हार मानली नाही. पाहिला त्याने पातेरा इस्कुन पाहिला. बाकीचेही त्याला मदत करू लागले
पातेरा इसक्तना तेजसच्या दोन टांगा मधून ती कोंबडी भुरकन उडून गेली. पण तिचा एक पिल्लू मात्र तेथेच लपला होता. त्यांनी खूप शोधलं पण काही सापडेना. " इथे साधा पिल्लू पकडता येत नाही. कोंबडी काय घंटा पकडणार?" किशोर म्हणाला. पण तेजसला माहीत होतं ती इथेच कुठे तरी असेल. थोडे प्रयत्न केल्या नंतर सुकलेल्या पानाखाली जमीला मान टेकून डोळे बंद करून निपचित पडला होता. त्याला त्याने हातात उचलले आणि एक हास्य देऊन किशोरच्या हातात दिले. "हे घे. पाहिल आहेस का इतका देखने पिल्लू?" तेजस किशोर ला म्हणाला. त्याला हातात घेऊन किशोरचा आनंद गगनात मावेना. पिल्लूचा रंग गडद हिरवा. त्याचे निरागस डोळे. आकाराने गावठी पिल्लू पेक्षा लहान होता. तो सारखा सारखा ओरढत असे. त्याचे ओरडणे काही थांबतच नव्हते. हातातून निसटू नये म्हणून त्याला एका कापड्याच्या फडक्यात गुंडाळून मुठीत धरले.
घरी आल्यावर त्याने आई आणि बाबांना दाखवले. पण तो खूप आवाज करत होता. कदाचित त्याला भूक लागली असावी. त्याच्या समोर पाणी आणि दाणे टाकले. पण तो काही खाईना. नुसता चिव...चिव.. असा आवाज काढी आणि मान टेकून पडून जाई. किशोरला तर त्याची खूप दया आली. त्याला वाटले पिल्लुला आपण आईपासून दूर तर केले नाही? चूक झाली..चूक झाली.. त्याच्या भावाने त्याला रानात परत सोडण्याचा सल्ला दिला. त्याने किशोर आणि त्याच्या मित्रांच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उठवला, "तुम्ही त्या पिल्लाला इथे आणून पापच केली नाही तर एक अनैतिकता दाखवली आहे. काय बिघडलं होतं त्या पिल्लाने? त्याचे मटन करून खाणार होतात का? उद्या सकाळी याला परत सोडून ये."
किशोरला काय करायचे ते सुचेना. त्याला वाटे आताच बॅटरी हातात घ्यावी आणि रानात त्याला सोडून यावं. पण रात्री जाणे योग्य नव्हतं. त्या पिल्लाची प्रत्येक चिव.. चिव.. त्याच्या काळजाला पिघलवत होती. त्याच्या घश्याखाली अन्नाचा घास उतरत नव्हता. रात्रीची झोप तरी कुठे लागणार होती. हा पिल्लू इथेच मेला तर? हा विचार येताच त्याच्या हृदयाचा ठोका चुके. सारखा सारखा देवाजवळ प्रार्थना करे आणि केलेल्या कृत्याची क्षमा मागे.
सकाळ होताच त्याने प्रथम त्या पिल्लू कसा आहे ते पाहिले. तो आता शांत झाला होता. त्याची बहीण पिलुला हातात धरून दाणे भरवत होती. तो आता बरा वाटत होता. पण त्याला आता सोडून यावच लागणार होते. तो एक रानटी जीव आहे. त्याची आई त्याला जे शिकवेल ते आपण नाही शिकूउ शकत.
मित्र किशोरच्या घरापाशी त्याला बोलवायला आले. त्याने त्याला हातात धरुन कपड्यात गुंडाळले आणि मित्रांसोबत रानात निघाला. मित्र शांत होते कोणी काही बोलत नव्हता. ते त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणावर ते पिल्लू घेऊन गेले होते. किशोरने पिल्लाला एक पप्पी घेतली आणि त्याचे डोळे भरून आले🥺. हातातून खाली ठेवून त्याला सोडून दिले. खाली सोडताच तो धडपडत चिऊ... चिऊ.. असा आवाज काढत निघून गेला.
Amazing story....keep writing
ReplyDelete